मुक्ताईनगर;- मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाची अनेक वर्षांपासून मागणी होती. मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने राज्यभर मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मुक मोर्चे काढले ४२ मराठा बांधवांनी आत्मबलीदान दिले. मराठा समाजाला आरक्षणाची खऱ्या अर्थाने गरज होती.मात्र असे असताना देखील मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा तरूण देशोधडीला लागून त्यांचे भाविष्य अंधकारमय झाले आहे.दोन्ही सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाही.त्यामुळे मराठा समाजातील जनभावना उद्रेक होण्याआधी आतातरी केंद्र व राज्य सरकारांनी समन्वयाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जातीने प्रयत्न करावेत.अशा मागणीचे निवेदन मुक्ताईनगर तालुका मराठा समाज संचलित राजे लखुजीराव मराठा समाज विकास बहुद्देशीय संस्था यांच्या वतीने तहसिलदार श्वेता संचेती , पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांना निवेदन देण्यात आले.
वेदन देतेवेळी संस्थेचे अध्यक्ष आनंदराव देशमुख , उपाध्यक्ष माणिकराव पाटील, सचिव यु डी पाटील, कोषाध्यक्ष वसंत पाटील, सहसचिव संदीप बागुल , संचालक ईश्वर रहाणे , दिनेश कदम, दिलीप पाटील , संतोष मराठे, नवनीत पाटील, ऍड पी एल पाटील यांचेसह ऍड पवनराजे पाटील, रामभाऊ पाटील, अविनाश बोरसे, अनिल कान्हे, ऍड नीरज पाटील, जयेश पाटील आदींची उपस्थिती होती.







