मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला डॉ. पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद
अमळनेर : मतदार संघाचे माजी आमदार डॉ बी. एस. पाटील हे स्वतःचा दवाखाना बंद करून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी आज मुख्यमंत्री यांच्या कडे अर्ज केला आहे. तसेच रुग्ण सेवेसाठी कुठेही जाण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला डॉ. बी. एस. पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत. आज मुख्यमंत्री यांच्या कडे ई-मेल द्वारे नाव नोंदवले आहे. तसेच शासनाच्या आवाहणानुसार आपला स्वतःचा दवाखाना बंद करून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी अनुभवी डॉक्टर म्हणून राज्यात कुठेही शासनाच्या निर्णयानुसार कोठेही सेवा देण्यास तयारी दर्शवली आहे. डॉ. पाटील यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच असे डॉक्टर देशाला हवे असल्याचे देखील या वेळी प्रतिक्रिया समोर येत आहेत.