डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार
जळगाव – विषारी द्रव्य सेवन करुन जीवन संपविण्याच्या प्रयत्न करणार्या ४५ वर्षीय महिला रुग्णांवर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आल्याने तिचे प्राण वाचले.
जामनेर तालुक्यातील रहिवासी पार्वतीबाई उत्तम भिल (वय ४५) यांनी विषारी द्रव्य सेवन केले होते. त्यामुळे पार्वतीबाई भिल हिची प्रकृती खालावली होती. त्यांच्या कुटूंबियांनी स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिकट झाल्याने त्यांना तातडीने डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञांनी दिला होता. त्यानुसार दि. ८ मे रोजी पार्वतीबाई भिल यांना डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले, महिला रुग्णाची प्रकृती लक्षात घेता त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले, याठिकाणी वैद्यकीय अधिक्षक डॉ.चंद्रैय्या कांते यांच्या मार्गदर्शनाखाली महिलेच्या आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्यात, त्यानंतर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. वैद्यकीय तज्ञांनी केलेल्या उपचाराला यश मिळून पार्वतीबाई भिल यांचे प्राण वाचले.
यावेळी डॉ.कांते, डॉ.पुजा तन्नीरवार, डॉ.तेजस, डॉ.सुशांत, डॉ.सुशिल, डॉ.जुनैद, डॉ.समाधान यांच्यासह स्टाफ टोबी थॉमस, हर्षल सयाजी, राहुल विचावे, आकाश धनगर, स्वरुप कुमडी, दिपाली तायडे, वृषाली जावळे, प्रगती पुणेकर, तनया नरेंद्रा, चेतन पाटील, एन्जेला एलीस, स्वीटी दिवे, प्राजक्ता व्यव्हारे, ऐश्वर्या, चेतन पाटील आदिंनी रुग्णाला उपचार दिले. उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने डिस्चार्ज देण्यात आला.