• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ट्रॅक्टर रॅलीवर पोलिसांचा लाठीमार ; दिल्लीत तणाव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 26, 2021
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – नवी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर दिल्लीत तणाव निर्माण झाला आहे. आयटी येथे शेतकऱ्यांनी पोलिसांची व्हॅन, क्रेन ताब्यात घेतली आहे. त्यामुळे पोलीस या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करत आहे. शेतकरी आंदोलन अधिकच चिघळल्याने दिल्लीतील मेट्रोही बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. शेतकरी लाल किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवल्याने संपूर्ण दिल्लीला छावणीचं स्वरुप आलं आहे.

पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी दुपारी 12 वाजेची वेळ दिली होती. पण संयुक्त शेतकरी मोर्चाच्या नेत्यांचं न ऐकता शेतकऱ्यांनी ही रॅली काढली. तसेच शेतकऱ्यांना रॅलीसाठी जो मार्ग आखून दिला होता. त्या मार्गावरून शेतकऱ्यांनी रॅली काढली नाही. शेतकऱ्यांनी वेगळ्याच मार्गाने रॅली काढली होती. सिंधु बॉर्डरवरून ही रॅली निघणार होती. मात्र, या मार्गाने न जाता शेतकरी आयटीओपर्यंत पोहोचले. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवल्याने पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. त्यातच दगडफेक सुरू झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. याचवेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्यास सुरुवात केली.

रस्ते ब्लॉक

शेतकऱ्यांचं आंदोलन थोपवण्यासाठी पोलिसांनी अक्षरधाम आणि आश्रम येथील रस्ते ब्लॉक केले आहेत. रस्ते बंद असले तरी शेतकरी अक्षरधामच्या दिशेने कूच करत आहेत. तर आश्रम रोडवरून आंदोलकांनी येऊ नये म्हणू पोलिसांनी रस्त्यात जेव्हीसी मशीन उभी केली आहे. मात्र, त्यामुळे सामान्य नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली असून वाहतुकीसाठी रस्ता उघडण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. शेतकरी आक्रमक झाल्याने पोलिसांनी जीटी करनाल रोड, आऊटरिंग रोड, बादली रोड मधुबन चौक, नरेला रोड आदी मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली असून या मार्गावरून प्रवास न करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तसेच वजीराबाद रोड, आयएसबीटी रोड, पुश्ता रोड, विकास मार्ग, एनएच-24 रोड आणि नोएडा लिंक रोडवरही वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.

मेट्रो बंद

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. इंद्रप्रस्थ मेट्रो स्टेशनचे सर्व एन्ट्री आणि एक्झिट गेट बंद करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे बादली, रोहिणी सेक्टर 18-19, हैदरपूर बादली मोड, जहांगीरपुरी, आदर्श नगर, आझादपूर, मॉडल टाउन, जीटीबी नगर, विद्यापीठ, विधानसभा आणि सिविल लाइन्समधील मेट्रोचे गेट बंद करण्यात आले आहेत.


 

 

Previous Post

किनगावच्या महिलेवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीने केली आत्महत्या

Next Post

चाळीसगावात घरफोडी ; ४६ हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चाळीसगावात घरफोडी ; ४६ हजारांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!
1xbet russia

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026
पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon