जालना प्रतिनिधी – १८ वर्षांवरील तरुणांसाठी २१ जून पासून सुरू होणारी लसीकरण मोहीम सर्वांनी यशस्वी करावी असे आवाहन येथील अम्रुतक्ष कलश या सेवाभावी संस्थेतर्फे करण्यात आले आहे. याबाबत संस्थेचे संस्थापक डॉ. संतोष भाले यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की कोरोना प्रतिबंधक लसीबाबतीत आजही अनेकांच्या मनात भीती आहे. मात्र मनात कुठलीही भीती न बाळगता तरूणांनी ही मोहीम यशस्वी करावी. यासाठी अम्रुत कलश संस्थेमार्फत लसीकरण जनजागृती साठी शिबीर घेतले जात असून माहिती पत्रके वाटण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयाचे आजार असणारयांनी तर ही लस अगोदर घ्यावी. कारण त्यांना संसर्गाचा धोका अधिक आहे. शिवाय लसीकरणानंतर इतर आजार असणारयांनी आपली नियमित औषधे वेळेवर घेत रहावी. लसीकरणानंतर कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प असून संसर्ग झाला तरी त्याची तीव्रता व म्रुत्यूचे प्रमाण अगदी नगण्य आहे. त्यामुळे तरुणांसोबत ४५ वर्षांवरील नागरिकांनीही लसीकरणाला गांभीर्याने घ्यावे. प्रत्येक गावातील तरुणांनी गावस्तरावर लसीकरण जनजागृतीसाठी पुढे यावे असे आवाहनही डॉ.भाले यांनी केले आहे.