मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगरचे गटविकास अधिकारी असलेले संतोष नागटीलक यांच्या कडून वृत्तसंकल करण्यास मंडे टू मंडे चे स्थानिक पत्रकार अक्षय काठोके यांना दमबाजी करत माझ्या बद्दल बातमी लावायला कोणी सांगितले. आताच तुझ्यावर गुन्हा दाखल करतो या भाषेत आवाज दडपण्याचा व लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला. याचा निषेध म्हणून पत्रकारांतर्फे निवेदन देण्यात आले.
जर असेच अधिकारी पत्रकारांना धमक्या देत असतील तर पत्रकार संरक्षण कायदा काशासाठी ? एकंदरीत पत्रकारांच्या आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असून उपस्थित सर्व पत्रकाराच्या वतीने संबधीत घटनेचा निषेध नोंदवन्यात आला व सदरील अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास सर्व पत्रकारांच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक, तहसीलदार दालनातील तायडे , रोहिणी ताई खडसे यांना देण्यात आले. निवेदन देतांना अक्षय काठोके (प्रतिनिधी- मंडे टू मंडे ), अतिक खान वार्ताहर (वायरल न्युज), अक्षय पालवे वार्ताहर (अहिल्याराज ),शाकीर शेख (कृषी समृद्धी टीव्ही), रवी गोरे (Tv9), किरण पाटील( स्वराज्य टीव्ही मराठी), योगेश पाटील (जे डी महाराष्ट्र )न्युज, विनोद बेलदार (खान्देश विश्व्वेध), सतीश गायकवाड (महाराष्ट्र दर्पण )न्युज, पंकज तायडे (इंडिया न्युज,) विठ्ठल धनगर (मुक्ताई लाईव्ह )मोहन मेढे (लोकशाही,) प्रमोद सौंदले (नजरकैद )आदी पत्रकार उपस्थित होते. सदर निवेदनाच्या प्रति. आ.चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर विधानसभा), खासदार. रक्षा खडसे (रावेर लोकसभा )
अँँड. रोहिणी खडसे-खेवलकर (अध्यक्षा-जिल्हा बँक, जळगाव), श्री.एकनाथराव खडसे (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य), श्री.रामकृष्ण पवार (पोलीस निरीक्षक, मुक्ताईनगर), डॉ.बी. एन. पाटील (मुख्य अधिकारी ZP, जळगाव), डॉ.श्री. अभिजित राऊत (जिल्हाधिकारी,जळगाव) यांना प्रति पाठवण्यात आल्या.