पवन ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील पवन चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेतर्फे रक्षाबंधन सणनिमित्त वृक्ष व झाडाचे रक्षण होण्यासाठी तसेच समाजात सलोख्याचे संबंध कसे राहतील याबाबत समन्वय साधून राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रीय एकात्मता विषयी डॉ. विलास नारखेडे यांनी मत व्यक्त केले. राष्ट्रीय एकात्मता कशी टिकून राहील तसेच आपल्या देशाला एकता राहील याबाबत प्रबोधन केले पाहिजे असे मत डॉ. नारखेडे यांनी व्यक्त केले. यावेळी विविध वृक्षासह झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरी करण्यात आली. सामाजिक वनीकरणाचे समाधान सोनवणे, अमोल ढोबळे, संभाजी पाटील यांनी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व विशद केले. तर सचिव रघुनाथ राणे यांनी राष्ट्रीय एकात्मता व रक्षाबंधनाच्या संबंधाविषयी अनेक बाबी सांगितले. या उपक्रमात डॉ. विलास नारखेडे, लीलाधर नारखेडे,,राजेश वाणी ,पवन नारखेडे, संतोष पाटील, जगदीश कुमार, ॲड. सलीम शेख, विशाल सोनवणे इत्यादी उपस्थित होते.