चाळीसगावात माणुसकीला काळिमा
चाळीसगाव (प्रतिनिधी):- तालुक्यातील एका गावात एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका ७५ वर्षीय वृद्धाने १४ वर्षांच्या दिव्यांग मुलीवर राहत्या घरात लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही घटना २३ मार्च रोजी दुपारी १ ते १:३० वाजेच्या सुमारास घडली. पीडित मुलगी (वय १४ वर्ष) ही दिव्यांग असून घटनेच्या वेळी ती आपल्या राहत्या घरी होती. याच संधीचा फायदा घेत संशयित आरोपी युवराज रूपसिंग चव्हाण (वय ७५, रा. हिंगोणे, ता. चाळीसगाव) याने मुलीच्या घरात प्रवेश केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
पीडितेच्या आईने (वय ३५) याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करत आहेत. संशयित आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात नसून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एका ७५ वर्षीय वृद्धाने नातीच्या वयाच्या दिव्यांग मुलीसोबत केलेल्या या कृत्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.









