चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील एका ६५ वर्षीय वृध्दाचे तोंड दाबून तरूणाने त्यांच्या खिशातील १ हजार रूपयांची रोकड लांबविले संशयितांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामदास दौलत पाटील (वय-६५ , रा. हिरापुर ) सेवानिवृत्त कर्मचारी आहेत . २६ ऑक्टोबररोजी दुपारी ते शहरातील एचडीएफसी बँकेच्या एटीएम समोर आले. त्यावेळी संशयित आरोपी सनी विष्णु चव्हाण (वय-२२ , रा. वडगाव ता – गंगापुर जि.औरंगाबाद ) या तरूणाने मागून येवून त्यांचे तोंड दाबुन त्यांच्या खिशातून १००० रूपयांची रोकड काढून घेतली व पसार झाला. रामदास पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स पो नि विशाल टकले करीत आहेत.