जळगाव ;- सामान्य रूग्णालय कोविड १९ घोषित केल्यानंतर सामान्य रूग्णालयातील रूग्णांना सेवा देण्यासाठी व कोरोनाच्या मुकाबल्यासाठी डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाची यंत्रणा सज्ज झाली आहे.यात नियमांचे काटेकोर पालन,सोशल डिस्टसिंगवर भर व तज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे.
सोमवार दि ६ एप्रिलपासून सामान्य रूग्णालय कोविड १९ म्हणून घोषीत केल्यानंतर जिल्हाधिका—यांची माजी खा. डॉ उल्हास पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेप्रमाणे डॉ उल्हास पाटील वैद्यकिय सामान्य रूग्णालयातील रूग्णांना डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात स्थलांतरीत करण्यात आले असून गेल्या तिन दिवसात ५५० च्या रूग्णांनी ओपीडीत आपली तपासणी करून घेतली आहे. तसेच ५० च्या वर शस्त्रक्रियसाठी रूग्ण दाखल करण्यात आलेल्या आहे. नियमांचे काटेकोर पालन, सोशल डिस्टसिंगवर भर देत तज्ञ डॉक्टरांची टीम मार्गदर्शन करत आहे. स्वता माजी खा. डॉ उल्हास पाटील दिवसभर थांबून रूग्ण व नातेवाईकांची विचारपूस करत असल्याचे चित्र दिसत आहे.
रूग्णांनी मानले जिल्हाधिका—यांचे आभार
गेल्या तिन दिवसापासून जिल्हावासियांना डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या माध्यमातून वैद्यकिय सेवा उपलब्ध करून दिली.संतोष चंद्र व वैशाली चंद्रे या दापत्याला गंभीर दुखापत होउन वेळीच उपचार मिळाल्याने जिव वाचला त्याचेसह या रूग्णालयातील उकृष्ट सेवा तसेच तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व उपचारामूळे भारावून गेलेल्या अनेक रूग्णांनी तसेच जिल्हयातील जनतेने डॉ अविनाश ढाकणे यांचे आभार मानले आहे. तर रूग्णालय प्रशासनाने देखिल कोरोनाच्या संकटात डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय अधिग्रहीत करून सेवेची संधी दिल्याबददल उकृष्ट सेवेची हमी देत आभार मानले आहे.
नियमांचे काटेकोर पालन, सोशल डिस्टनिंगवर भर अत्यावश्य सेवा उपलब्ध
रूग्णालय प्रशासनाने रूग्णांची काळजी घेत नियमांचे काटेकोर पालन करत आहे. सोशल डिस्टनिंगवर भर तर दिली तर जात आहे याचबरोबर गर्दी टाळण्यासाठी प्रवेशव्दारावर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे. रूग्णालयाबाहेर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. याच बरोबर मार्गदर्शनासाठी तज्ञांची टीम तैनात करण्यात आली आहे.
कोरोनावर मात करण्याचा दृढ निश्चय — माजी खा. डॉ उल्हास पाटील
देशावर आलेले हे संकट मोठे आहे. अशा संकटसमयी जिल्हावासियांना सेवा देण्यासाठी संधी मिळाली या संधीचे आम्ही सोने करणार असून कोरोनावर मात करण्याचा दृढ निश्चय केला असल्याचे माजी खा. डॉ उल्हास पाटील यांनी सांगीतले.