विवरे (प्रतिनिधी ) – शिक्षण विकास मंडळ संचालित श्री.ग.गो.बेंडाळे हायस्कूल विवरे येथील प्रांगणात शाळेसाठी ज्यांनी जागा दिली असे गावातील सधन व प्रगतशील व दानशूर शेतकरी कै. गणपत गोविंदा बेंडाळे यांच्या पुतळ्याचे अनावरण मा.नामदार रक्षाताई खडसे केंद्रीय युवक कल्याण राज्यमंत्री भारत सरकार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच विवरे गावाच्या शैक्षणिक घडामोडीत ज्यांचं महत्त्वाचं योगदान आहे अशा कै.गोदावरी वासुदेव पाटील यांच्या प्रतिमेचे अनावरण मा.आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.डॉ उल्हास वासुदेव पाटील माजी खासदार व अध्यक्ष गोदावरी फाउंडेशन जळगाव हे होते.श्री ग.गो.बेंडाळे हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत केले.

शिक्षक नेते सहकार महर्षी श्री एस डी भिरूड सर माजी अध्यक्ष जळगाव पतपेढी व बापूसो उदय मधुकर पाटील माजी अध्यक्ष यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे चेअरमन प्रा शैलेश राणे यांनी केले. शाळा निर्मितीचा इतिहास व संस्थेची प्रगती सांगितली याप्रसंगी शिक्षण विकास मंडळ विवरे यांच्या वाटचाली विषयीची स्मरणिका माजी आमदार श्री.शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते व शाळेचा गौरव विशेषांक माजी आमदार श्री अरुणदादा पांडुरंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या समारंभा प्रसंगी गणपत गोविंदा बेंडाळे यांच्या कन्या श्रीमती शकुंतला मुरलीधर बोरोले व दुसरी कन्या सौ सिंधू जगदीश पाटील यांनी प्रत्येकी 51 हजार तर तिसरी कन्या श्रीमती विमल देवराम गुळवे यांनी 21000 व विवरे गावातील प्रगतशील सधन शेतकरी तथा . अँग्लो उर्दू हायस्कूल विवरे चेअरमन शे रफिक शे बिस्मिल्ला यांनी 21000 तसेच विवरे ग्रामपंचायतचे माजी सरपंच व बेंडाळे हायस्कूलचे माजी विद्यार्थी वासुदेव नरवाडे यांनी 5100 रोख संस्थेला देणगी स्वरूपात मदत केली. कार्यक्रम प्रसंगी 5001 गुप्त दान करण्यात आले.
आमदार अमोल जावळे यांनी शिक्षण विकास मंडळ विवरे संस्थेच्या विकासासाठी सदैव सहकार्य राहील.त्यांनी संस्था व शाळेसाठी अभ्यासिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच मा. नामदार रक्षाताई खडसे यांनी शाळेला क्रीडांगण आणि व्यायामशाळे संबंधी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच देशाला पुढे न्यायचे असेल तर पुढील पिढीला चांगले संस्कार व शिक्षण दिले पाहिजे असे प्रतिपादन केले.
माजी आमदार शिरीष दादा यांनी कै.मधुकरराव चौधरी यांनी संस्थेला केलेला मदतीचा उल्लेख कार्यक्रमात झाल्याबद्दल ऋण व्यक्त केले व भविष्यात माझ्याकडून जे जे मदत करता येईल असे आश्वासन दिले. माजी आमदार अरुणदादा पाटील यांनी संस्था व शाळेबद्दल यशस्वी कार्यक्रमाबद्दल गौरव उद्गार काढले. आपल्या अध्यक्ष मनोगतातून माजी खासदार डॉ उल्हासदादा पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीचा गौरव केला.गोदावरीआईचा फोटो शाळेच्या मुख्य कार्यालयात लावल्याबद्दल गावाचे व संस्थेचे ऋण व्यक्त केले. व संस्थेला जे जी मदत लागेल ती करण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमादरम्यान कै. गणपत गोविंदा बेंडाळे यांचा पुतळा तयार करणारे शिल्पकार श्री गणेश छत्रे संभाजीनगर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच शाळेची दुरुस्ती करणारे मुक्तार मिस्तरी, रंगकाम करणारे हर्षल वाघ ,प्लंबर राहूल महाजन, वेल्डींग काम सोहम फेगडे हर्षल राणे यांचाही संस्थेला सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला .शाळेला नेहमी सहकार्यसहकार्य करणाऱ्या श्रीमती नीलम पुराणीक मुख्याध्यापिका सौ कमलाबाई गर्ल्स हायस्कूल रावेर यांना विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबई या ठिकाणी आयोजित INDIAN TALENT OLYMPIAD EXCELLENCE AWARD 2025-2026 या कार्यक्रमाच्या अध्यक्षा भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी आदरणीय डॉ किरण बेदी व ऑलिम्पिक मेडलिस्ट पद्मभूषण सायना नेहवाल यांच्या शुभहस्ते THE BEST PRINCIPAL AWARD प्रदान करण्यात आला. त्याबद्दल मुख्याध्यापिका श्रीमती निलीमा पुराणिक मॅडम यांचाही सत्कार करण्यात आला
याप्रसंगी श्री अजबसिंग पाटील अध्यक्ष ग स सोसायटी जळगाव, श्री जे के पाटील अध्यक्ष मुख्याध्यापक संघ महाराष्ट्र राज्य, सुरेश धनके माजी शिक्षण व आरोग्य सभापती जि.प. जळगाव, श्री शरद महाजन चेअरमन टेक्निकल व एज्युकेशन सोसायटी फैजपूर, प्रा प्रकाश मुजुमदार सर माजी अध्यक्ष रावेर शिक्षण संवर्धक संघ रावेर, श्री शितल पाटील माजी नगराध्यक्ष व चेअरमन रावेर शिक्षण संवर्धक संघ रावेर, पद्माकर महाजन माजी नगराध्यक्ष रावेर, ज्ञानेश्वर महाजन माजी नगराध्यक्ष रावेर, प्रल्हाद पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर, राजीव पाटील अध्यक्ष रघुशांती फाउंडेशन रावेर, हेमंतशेठ नाईक अध्यक्ष रावेर शिक्षण प्रसारक मंडळ रावेर, रवी पवार अध्यक्ष स्वामी एज्युकेशनल ग्रुप रावेर, मोहन पाटील चेअरमन निंबोल हायस्कूल, सुनील महाजन अध्यक्ष चिनावल हायस्कूल, यु यु दादा पाटील जिल्हाध्यक्ष जळगाव शैक्षणिक समन्वय संघटना जळगाव, श्री एच जी इंगळे जिल्हाध्यक्ष माध्यमिक शिक्षक संघटना जळगाव, संभाजी आप्पा पाटील माजी अध्यक्ष माध्यमिक पतपेढी जळगाव, भाऊसाहेब आर एच बाविस्कर माजी अध्यक्ष पतपेढी जळगाव, श्री सुनील गरुड जेष्ठ मार्गदर्शक जूनियर कॉलेज शिक्षक संघटना, श्री सी सी वाणी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना फेडरेशन, श्री भरत महाजन माजी जि.प.सदस्य जळगाव, श्री सोपान पाटील जिल्हाध्यक्ष रा.काँ किसान सेल जळगाव, श्री साहेबराव शिंदे साहेब गटशिक्षणाधिकारी रावेर, श्री प्रल्हाद बोंडे अध्यक्ष कृषी विद्यालय निंभोरा, अँड संदीप भंगाळे अध्यक्ष खिर्डी हायस्कूल, ताईसो कल्पना पाटील माजी संचालिका गस सोसायटी जळगाव, एडवोकेट सय्यद अफगान शब्बीर चेअरमन अँग्लो उर्दू हायस्कूल रावेर श्री चंद्रकांत भंगाळे माजी सरपंच चिनावल, डॉ श्री सुभाष पाटील माजी सभापती पंचायत समिती रावेर, ॲड प्रा. सूर्यकांत देशमुख तालुकाध्यक्ष भाजपा रावेर, श्री सुनील पाटील उपाध्यक्ष भाजपा रावेर, श्री वासुदेव नरवाडे माजी सरपंच विवरे बुद्रुक, श्री यादवराव पाटील चेअरमन विकासो व माजी सरपंच विवरे बुद्रुक, युनुस सबाज तडवी सरपंच विवरे बुद्रुक, सौ स्वरा पाटील सरपंच विवरे खुर्द, श्री विजय पाटील प्रगतशील शेतकरी वडगाव, श्री धनराज पाटील माजी सरपंच वडगाव, शेख रफिक शेख बिस्मिल्ला चेअरमन अँग्लो उर्दू हायस्कूल विवरे, ज्ञानेश्वर पाटील चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी विवरे खुर्द, श्री चंद्रकांत गाढे सामाजिक कार्यकर्ते विवरे बुद्रुक, श्री गिरीश बेंडाळे चेअरमन पीक संरक्षण सोसायटी बुद्रुक , जळगाव पतपेढीचे संचालक आबा पाटील, डी ए पाटील, मनोहर सूर्यवंशी, दिगंबर पाटील, भुसावळ माध्यमिक पतपेढीचे संचालक नरेंद्र दोडके, विनोद पाटील, रावेर शिक्षण संवर्धक संघ संस्थेचे संचालक तुषार मानकर, संतोषशेठ अग्रवाल, शैलेंद्र कुमार देशमुख, श्रीमती नीलम पुराणिक मॅडम मुख्याध्यापिका कमलाबाई गर्ल्स हायस्कूल रावेर तसेच श्री शैलेश राणे चेअरमन, श्री मार्तंड भिरूड अध्यक्ष, श्री मनोहर राणे उपाध्यक्ष, श्री केशव राणे सचिव, श्री धनजी लढे संचालक, रामचंद्र देशमुख संचालक, वसंत राणे संचालक, किरण पाचपांडे संचालक, श्री दिलीप राणे संचालक, श्री रविंद्र भिरूड संचालक, श्रीमती संगीता पाचपांडे संचालिका, श्री पी.एच.वायकोळे मुख्याध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सौ निलिमा नेमाडे यांनी केले तर आभार तेजल भिरूड यांनी मानले. कार्यक्रमानंतर स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. समारंभाला जिल्हाभरातून विविध संघटना, संस्थांचे पदाधिकारी मुख्याध्यापक ग्रामस्थ माजी विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक विभागातील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी परिश्रम घेतले.









