जळगाव (प्रतिनिधी) :- येथील चर्चजवळ असलेल्या विवेकानंद क्लासेस मध्ये दि २४ डिसेंबर रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात होते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नववैज्ञानिकांना व्यासपिठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न संचालकांनी केला.

इ ५ ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी स्वकल्पनेतून तयार केलेले वैज्ञानिक अविष्कार या प्रदर्शनात ठेवले होते. हे प्रदर्शन सर्वासाठी खुले व निशुल्क आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ही नवीन संकल्पना विवेकानंद क्लासेसने अमलात आणली असून यातून विदयार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला असल्याचे संचालकांनी सांगितले आहे. या प्रदर्शनात २० विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. चांद्रयान,वॉटर हार्वेस्टींग सिस्टम, सोलर लाईट अशा विविध प्रकारच्या संकल्पना या प्रदर्शनातून मांडलेल्या होत्या. प्रदर्शन बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठया प्रमाणावर गर्दी केली होती.









