जळगाव ( प्रतिनिधी ) – उमाळा येथील माहेरावशीणीला विवाहितेला माहेरहून पैसे आले नाही या कारणावरून शारीरिक छळ करत मारहाण करत छळ केल्याचा प्रकार गुरुवारी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. यासंदर्भात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहिती वरून, भुसावळ तालुक्यातील जोगलखेडा येथील माहेर असलेल्या सरला किरण कोळी (वय 23) यांचा विवाह जळगाव तालुक्यातील उमाळा येथील किरण सुपुडू कोळी यांच्याशी सन २०१५ मध्ये रीतीरिवाजानुसार लग्न झालेले आहे. लग्नाच्या सुरुवातीचे दिवस चांगले गेले, त्यानंतर तिचे पती आणि सासरच्या मंडळींनी माहेराहून पैशांची आणण्याची मागणी केली. दरम्यान विवाहितेने माहेराहून पैसे आले नाही, म्हणून तिला शारीरिक व मानसिक छळ केला तसेच पती यांच्याकडून त्यांना मारहाण करण्यात आली.
विवाहितने माहेराहून पैसे आणले नाही, म्हणून त्यांच्या सासरच्या मंडळींनी छळ केला. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने भुसावळ तालुक्यातील जोगलखेडा येथे माहेरी निघून आल्या. त्यांनी गुरुवारी १६ नोव्हेंबर रोजी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती किरण सुपडू कोळी, सासरे सुपडू हिरामण कोळी, सासू शोभाबाई सुपडू कोळी आणि जेट युवराज सुपडू कोळी सर्व राहणार उमळा, ता.जि. जळगाव यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोहेकॉ वाल्मीक सोनवणे करीत आहे.