जळगाव ( प्रतिनिधी ) – रायपूर येथील माहेर असलेल्या विवाहितेचा दागिन्यांसाठी पती व सासरच्यांकडून छळ होत होता पतीसह सासरच्या मंडळींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिना नरेंद्र एखंडे (वय-२८) यांचा विवाह मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील नरेंद्र एखंडे यांच्याशी सन २०१७ मध्ये झाला. काही दिवस चांगले गेल्यानंतर लहान सहान कारणांवरून कुरापत काढून विवाहितेला मानसिक त्रास देण्याचे काम पतीकडून सुरू झाले.सासरच्या मंडळींनी घर बांधण्यासाठी माहेरहून १ लाखांची मागणी केली. विवाहितेच्या आई वडिलांनी १ लाख रुपये व्याजाने काढून सासरच्या मंडळींना दिले. तरीदेखील पुन्हा त्यांनी शारीरिक व मानसिक छळ सुरू ठेवला. लग्नात दिलेले २० ग्रॅम सोन्याचे दागिन्यांची मागणी केली असता त्या छळाला कंटाळून माहेरी रायपूर येथे निघून आल्या.
काल एमआयडीसी पोलीस ठाण्यात या विवाहितेच्या तक्रारीवरून पती नरेंद्र एखंडे, सासरे केशव एखंडे, सासू लताबाई एखंडे आणि दीर कैलास एखंडे ( सर्व रा. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश ) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तपास पो ना सचिन पाटील करीत आहेत .