जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील गुलमोहर कॉलनी येथील विवाहितेला तिने माहेरून एक लाख रुपये आणावेत या कारणावरून तिचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध मंगळवार ४ जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती वरून, जळगाव शहरातील गुलमोहर कॉलनी येथील माहेर असलेल्या पूर्वा कमलेश पाटील यांचा विवाह जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील कमलेश अरुण पाटील यांच्यासोबत झाला आहे. लग्नानंतर दोन ते तीन महिने चांगले गेल्यानंतर पतीसह सासरच्यांनी पूर्वा हिला तुझ्या आई वडिलांनी आमच्या मर्जीप्रमाणे लग्न केले नाही. तर पतीने ही दारूच्या नशेत पूर्वा हिला टोचून बोलत तिचा छळ केला. याच दरम्यानच्या काळात तुझ्या वडिलांनी पैसे कमी दिले आहेत तू आता परत माहेरून एक लाख रुपये घेऊन ये नाहीतर आम्ही तुला नांदवणार नाही फारकत देऊन टाकू अशी पैशांची मागणी करत वारंवार धमकी देत पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. याच कारणांवरून विवाहितेला शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण सुद्धा केली तसेच नांदविण्यास नकार दिला.छळाला कंटाळून विवाहिता ह्या जळगाव शहरातील गुलमोहर कॉलनी येथे माहेरी निघून आल्या. व मंगळवारी या छळाबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीवरून पूर्वा हिचे पती कमलेश अरुण पाटील, सासरे अरुण नाना पाटील , सासू प्रमिला अरुण पाटील, सतीश अरुण पाटील सर्व रा. ममुराबाद, ता.जळगाव या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनील पाटील हे करीत आहेत.