जामनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील पिंपळगाव चौखंबे येथील गावात मुलबाळ होत नाही म्हणून, विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू सासऱ्यांवर पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी अद्याप फरार आहेत.
पिंपळगाव चौखांबे येथे गेल्या दोन वर्षांपासून ३० वर्षीय विवाहिता पती राजेंद्र धरमदास झाडे, सासू रमाबाई झाडे, सासरा धरमदास झाडे यांच्यासह राहत आहे. तेथे फिर्यादी विवाहितेला सासरच्यांनी वेळोवेळी, तुला मुलबाळ होत नाही. आम्हाला आमच्या मुलाचे दुसरे लग्न करायचे आहे, फारकत देऊन टाक असे टोचून बोलले. तसेच, घरखर्चासाठी माहेरून ५० आण. असा तगादा लावून शारीरिक, मानसिक त्रास दिला आहे.
आता दि. १५ जून रोजी दुपारी संशयितांनी फिर्यादीला मुलबाळ होत नाही म्हणून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. म्हणून पहूर पोलीस स्टेशनला तिन्हि संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रवीण चौधरी करीत आहेत.