जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील टागोरनगरातील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणार्या पतीसह सासरच्यांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टागोरनगरातील माहेर असलेली ज्योती राहूल खरे (वय ३०) यांचा महाबळ परिसरातील समतानगरातील राहूल खरे यांच्यासोबत २५ मे २०११ रोजी विवाह झाला लग्नानंतर १० ऑगस्ट २०२१ पर्यंत पती राहूल भिका खरे यांच्या सासरकडच्या मंडळींनी वेळोवेळी विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आला. त्रास असह्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या होत्या.
त्यांनी शुक्रवारी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पती राहूल खरे, सासरे भिका खरे, सासू चंद्रकला खरे, नणंद लता साळवे ( सर्व रा. समतानगर) , मनिषा साळवे ( रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा) यांच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीत तपास प्रदिप पाटील हे करीत आहेत .