जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील पिंप्राळा येथील विवाहितेचा कौटुंबिक कारणावरून मानसिक व शारीरिक छळ केल्याने पतीसह सात जणांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रूपाली घनश्याम कोतवाल (वय – ३२ , रा. वाणी गल्ली पिंप्राळा ) यांचा विवाह इंद्रप्रस्थनगरातील घनश्याम प्रभाकर कोतवाल यांच्याशी झाला. सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यांनतर पती घनश्याम कोतवाल यांनी मानसिक व शारिरीक छळ सुरू केला.
यासाठी सासु लता बडगुजर, दीर ललित बडगुजर, देरानी मिनाक्षी बडगुजर, लहान दिर योगराज बडगुजर ( सर्व रा. इंद्रप्रस्थ नगर ) , नणंद उज्जवला बडगुजर व भारती बडगुजर ( रा. जळगाव ) यांनी देखील छळ व क्रुर वागणूक दिली. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी पिंप्राळा येथे निघून आल्या. व रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. बुधवारी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो ना राजेश चव्हाण करीत आहेत.