जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील पिंप्राळा रोड परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेचा तीस लाख रुपयांसाठी पतीसह सासरच्यांनी छळ केल्याची घटना समोर आली आहे. पतीसह चार जणांविरुध्द जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पिंप्राळा रोड परिसरातील लक्ष्मणनगर येथील हर्षा यांचा कोलकाता येथील क्रिष्णेंद्र मनोरंजन कुंडू यांच्याशी विवाह झाला आहे. लग्नानंतर काही दिवसांनी पती क्रिष्णेंद्र यांच्यासह सासू नणंद व नंदोई यांनी विवाहिता हर्षा हिस वेळोवेळी शिविगाळ करत मारहाण केली. माहेरहून तीस लाख रुपये आणावेत म्हणून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. छळाला कंटाळून हर्षा या माहेरी निघून आल्या. हर्षा कुंडू यांच्या तक्रारीवरून शनिवारी पती क्रिष्णेंद्र कुंडू, सासु दीप्ती मनोरंजन कुंडू ( रा. कलकत्ता) व नणंद मिठु सिन्हा , नंदोई राजीव सिन्हा दोन्ही ( रा. झारखंड ) विरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो हे कॉ फिरोज तडवी करीत आहेत.