जळगाव शहरातील सुंदर मोती नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : औषधविक्रीचे दुकान टाकण्यासाठी सासरच्या मंडळींनी मागितलेले पैसे देऊनदेखील उर्वरित पैश्यांसाठी छळ केल्याने २३ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली होती. या प्रकरणी माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पतीसह सासरच्या चौघांविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही संशयितांना अटक करण्यात आली आहे.

भगवान कडूबा बडुकले (वय ६०, रा. गजानन नगर, बुलढाणा) यांच्या यांनी फिर्याद दिली आहे. मयत विवाहिता मयुरी गौरव ठोसर (वय २३, रा. सुंदर मोतीनगर, सावखेडा शिवार, जळगाव) हिच्या सासरच्या मंडळींनी औषधविक्रीचे दुकान टाकण्यासाठी १० लाख रुपये माहेरुन आणण्यास सांगितले होते. त्यापैकी ८ लाख रुपये दिले होते. पुन्हा २ लाख रुपये मागणी केली. ती देऊ न शकल्याने मयुरी हिला वारंवार शारिरीक व मानसिक त्रास देण्यात आला. त्याला कंटाळून तिने ओढणीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यावरुन पती गौरव किशोर ठोसर, गणेश किशोर ठोसर, किशोर विश्वनाथ ठोसर व लताबाई किशोर ठोसर या चौघांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अनंत अहिरे हे करीत आहे. यातील पती गौरव ठोसर याला अटक झाली आहे.









