जळगावात पुढील तीन महिने हाउसफुल
जळगाव (प्रतिनिधी) :- दिवाळी पर्वानंतर आता वेध लागले आहेत, ते लग्नाच्या धुमधडाक्याचे. २३ नोव्हेंबरपासून तुलसीविवाह सुरू होत आहे. त्यानंतर लग्नाची धामधूम सुरू होणार आहे. यंदा २७ नोव्हेंबरपासून लग्नसराईला सुरवात होणार आहे.
जुलैपर्यंत तब्बल ६६ मुहूर्त आहेत. यंदा लग्नाची विक्रमी धामधूम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. लग्नसराईत मंगल कार्यालय, बँड, सराफी बाजार, इलेक्ट्रॉनिक्स कपडे, ऑटोमोबाइल आदी मोठ्या क्षेत्रात उलाढाल होईल, अशी आशा आहे. यासाठी आत्ताच सर्व ठिकाणी बुकिंग जोरदार सुरू असून पुढील तीन महिने हाऊसफुल झाल्याचे चित्र जळगाव शहरात दिसत आहे.
विवाहासाठी लागणारे घोडा, बग्गी, पुरोहित, हार-फुले सजावट, मंडप, मंगल कार्यालय आदी सर्वच क्षेत्रांना झळाळी येणार आहे.
असे आहेत विवाह मुहूर्त
नोव्हेंबर : २७, २८ व २९
डिसेंबर : ६ ते ८, १५, १७, २०, २१, २५, २६, ३१.
जानेवारी २०२४ : २ ते ६, ८.
फेब्रुवारी- १२, १३, १७, १८, २४, २६, २७, २८, २९.
मार्च : ३, ४, ६, १६, १७, २६, २७, ३०.
एप्रिल : १, ३, ४, ५, १८, २०, २१, २२, २६, २८.
मे : १ व २, जून : २९ व ३० जुलै : ११ ते १५