राहुरी (तालुका प्रतिनिधी ) –विश्वमनी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड या संस्थेच्यावतीने देखील आज स्वातंत्र्य दिन संस्थेच्या मुख्य कार्यालय ( राहुरी ) या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८ वाजता संस्थेच्या सर्व शाखांमधील कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीताचे गायन करत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला.या प्रसंगी महेश गिरे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बांबोरी परिसरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे संस्थेचे चेअरमन गणेश गोपाळे यांनी आपल्या मनोगतामधून संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यावेळी व्हा. चेअरमन संदीप जालिंदर आढाव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.