अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण
जळगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे चौथे विश्व मराठी संमेलन नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला जगभरातून १९ देशातील मराठी भाषिक नागरिक सहभागी झाले होते. तीन दिवस चाललेल्या या संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी बालरंगभूमी परिषदतर्फे अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थिंनींनी सहभाग घेत बहारदार कातकरी नृत्य सादर केले.


अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य शिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या विद्यार्थिंनीं व वादकांनी नाशिकमधील विश्व मराठी संमेलनात जळगावचा झेंडा दिमाखात रोवला. या कलावंतांना बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्षा ॲड.निलम शिर्के सामंत व प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल यांच्या प्रयत्नातून ही संधी मिळाली होती. या मिळालेल्या संधीचे आपल्या जोशपूर्ण नृत्याने या विद्यार्थिंनींनी सोने केले.
सादरीकरणानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थिंनी डिंपल चौधरी, भूमिका चौधरी, रेणुका पवार, पूर्वी भावसार, चिन्मयी जंजाळकर, स्वरा महाजन, सुंदरम चिमकर, विद्या सपकाळे, चेतन धनगर, हर्षिता निकुंभ तसेच वादक मोहित सोनवणे, ललित पवार, वेदांत जडे, रोहन चव्हाण, सचिन महाजन यांच्यासह संघप्रमुख ज्ञानेश्वर सोनवणे यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला. अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन व संचालिका निशा अनिल जैन यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे कौतूक आहे.









