जळगाव (प्रतिनिधी) – विश्व मानव रूहानी केंद्र नवानगर शाखा शिरसोलीतर्फे तालुक्यातील विटनेर येथे मोफत वैदयकीय शिबिर संपन्न झाले. शिबिरात १५० नागरिकांनी अनुभवी डॉक्टरांकडून तपासणी केली.
विश्व मानव रूहानी केंद्र हि आध्यात्मिक संस्था आहे. हि संस्था संत बलजित सिंह यांनी शिकवलेले नैतिक जीवन,अध्यात्म आणि ध्यानधारणा यावर आधारित कार्यक्रम आणि लोककल्याणासाठी विविध प्रकारच्या सामाजिक कार्याचे आयोजन करते. दि. १० सप्टेंबर रोजी विश्व मानव रूहानी केंद्र शाखा शिरसोली, यांच्या वतीने विटनेर ता. जि. जळगाव येथे मोफत वैदयकिय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यांना डॉक्टरांच्या सल्यानुसार मोफत औषध देण्यात आली. या प्रसंगी व गावांतील प्रतिष्ठित व्यक्ति उपस्थित होते.