अमळनेर तालुक्यातील जैतपीर येथील घटना
अमळनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील जैतपीर येथील विषारी औषध प्राशन केलेल्या २२ वर्षीय विवाहितेचा १ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
जैतपीर येथील दीपाली हर्षल चौधरी (वय २२) हिने ३० रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध प्राशन केल्याने तिला अमळनेर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासून धुळे येथे नेण्याचा सल्ला दिल्याने धुळे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
मात्र १ रोजी सकाळी ९ वाजता उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. तिचे वडील डीगंबर पुना चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहेत. आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट आहे.








