पारोळा तालुक्यातील शेळावे बुद्रुक येथील घटना
पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शेळावे बुद्रुक येथे एका ३६ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संदीप वासुदेव पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना आज सव्वा बाराच्या सुमारास उघडकीस आली. शेळावे बु गावातील खळ्यात संदीपने विष प्राशन केल्याने त्यास झटके येऊ लागले. त्यास खाजगी वाहनाने पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याबाबत समाधान पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.