मुक्ताईनगर तालुक्यातील नांदू पिंप्री येथे शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यातील नांदू पिंप्री येथील तरुणाने पुण्यात असताना विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना शनिवारी दि. ६ जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
पवन आत्माराम इंगळे (वय २५, रा. नांदू पिंप्री ता. मुक्ताईनगर, ह. मु. पुणे) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो नांदू पिंप्री गावात आई, वडील, भाऊ, वहिनी यांच्यासह राहत होता. वडील आत्माराम हे हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)तर पवन हा पुण्यात जॉब करीत होता. सुमारे १६ दिवसांपूर्वी त्याने पुण्यात राहत्या घरी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात गेल्या १५ दिवसांपासून उपचार सुरु होते.
मात्र त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. शनिवारी दि. ६ जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संध्याकाळी त्याचा मृतदेह पुढील शवविच्छेदनकामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. तरुणाच्या मृत्यूप्रकरणी नांदू पिंप्री गावात शोककळा पसरली आहे.