यावल;- विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात पुरातत्व खात्याचे,विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहणे यांनी भेट देऊन12लोकांना नोटिसा दिल्या आहेत,गेली17वर्षे कोणतीच कृती न करणाऱ्या पुरातत्व विभागाने किमान अतिक्रमणाच्या संदर्भात पाहणी करून नोटिसा दिल्या ही एक समाधानाची गोष्ट आहे; मात्र विशाळ गडावर वर्ष1998पासून मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण पहाता गडावर एकूण 64 मोठी आणि नव्याने बांधकाम झालेली 45 हून लहान/छोटी मोठी अतिक्रमण झालेली आहेत त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे,गेली अनेक वर्ष पुरातत्व खात्याने याकडे दुर्लक्ष केल्याने हा ऐतिहासिक विशाळगड आज अतिक्रमणाच्या विळख्यात आहे आणि तेथील मंदिरे नरवीरांच्या समाध्या दुर्लक्षित आहेत,त्यामुळे पुरातत्व विभागाने केवळ नोटिसा देण्यावर समाधान न मानता ठोस निर्णय घेऊन कालबद्ध कार्यक्रम आखून सर्व अतिक्रमणे हटविण्यात यावी अशी मागणी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
याचबरोबर विशाळगडाची ग्रामदेवता असणाऱ्या श्री वाघजाईदेवीच्या मंदिरासह सर्व मंदिराची दुरुस्ती आणि आमदार करण्यात यावा तसेच स्मारके समाध्या गटाची आणि तटबंदीची डागडुजी करण्यात यावी अशी मागणीही यानिमित्ताने विशाळगड संरक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती प्रवक्ते सुनील धनवट यांनी केली आहे.