विसरवाडी,जि. नंदुरबार/ जळगाव (प्रतिनिधी) – सुरत-नागपूर महामार्गावरील कोंडाईबारी घाटात जळगावहून सुरतकडे जाणारी खासगी लक्झरी बस अरुंद पुलावरून ३० फुट नदीत कोसळल्याची घटना बुधवारी २१ रोजी घडली आहे. या दुर्घटनेत ५ जण ठार तर ३४ जण गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले आहे. या दुर्घंटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. यात जळगाव जिल्हयातील दोन जण मृत तर, १४ जण जखमी झाले आहेत. शहरातील सिंधी कॉलोनी, मेहरूण, भादली येथील रहिवासी असलेले प्रवासी जखमी झाले आहे.
शुभम ट्रॅव्हल्स् कंपनीची खासगी लक्झरी बस सुरत-नागपूर महामार्गावरुन जळगावहुन सुरतकडे जात असताना पहाटे २:१० वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटातील दर्ग्याजवळील पुलाखाली कोसळली. या भीषण अपघातात महामार्गावर पुढे चालत असलेल्या किंग ट्रॅव्हल्सच्या बसला ओव्हरटेक करतांना अपघातग्रस्त शुभम ट्रॅव्हल्सने ड्रायव्हर साईडने धडक दिल्याने शुभम ट्रॅव्हल्सच्या चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे बस पुलावरून ३० फुट खाली नदीत कोसळली. किंग ट्रॅव्हलच्या मागील बाजूचा पत्रा फाटल्याने त्यातील चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. शुभम ट्रॅव्हल्सच्या बसमधील सर्वच प्रवासी जखमी झाले. त्यातील ५ प्रवासी जागीच ठार झाले. सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. अचानक बस खाली कोसळल्यामुळे अंधारात लहान मुले, महीला व पुरुषांचा किंचाळण्याचा आवाज येत होता. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक सुरक्षा पोलीस चौकी व स्थानिक मोरकरंजा, पानबारा व चौकी गावातील सरपंच व ग्रामस्थ, विसरवाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले.
अपघातातील मृतांमध्ये प्रतिमा मुकेश मरोटी (३६) रा.मॉडल टाऊन रेसिडन्सी ता.सारोली चौरामी सुरत, अमर अशोक बारी रा. पाचोरा जि.जळगाव, शमसोद्दिन शेख युसूफ (४७) रा.जाम मोहल्ला भुसावल या प्रवाशांसह बस चालक वर्दीचंद सोहनलाल मेघवाल (३५) रा.सुरत, सहचालक गणेश उर्फ पप्पू (३४) रा. सुरत या ५ जणांचा समावेश आहे.
अपघातातील जखमींमध्ये रोशनी अमर बारी (२३) रा. सुरत, आयुष अमर बारी (५) रा. सुरत, फारुक शेख गनी (५२) रा. सुरत, सुफीयाबी अनिफ शहा (५९) रा. सुरत, मुकेश रामचंद्र खाटिक (३७) रा. सुरत, समाधान लालचंद पाटील (३७) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव, रेखा समाधान पाटील (३०) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव, अयुबखॉ साहिलखॉ पठाण (५४) रा. मेहरुण जळगाव, अख्तरबी अयुबखॉ पठाण (५०) रा. मेहरुण जळगाव, कुर्शीदबी अयुबखॉ पठाण (४५) रा. मेहरुण जळगाव, प्रिया समाधान पाटील (९) रा. जळगाव, पुप्षा विलास पाटील (५५) रा. बोटे ता. शिरपूर, उर्वशी विनोद पाटील (१०) रा. बोटे ता. शिरपूर धुळे, मुकेश चंपकलाल जैन (४०) रा. सुरत, राजेश धर्मदास मकानी (५०) रा.सिंधी कॉलनी, जळगाव, सिद्धार्थ संजय बिऱ्हाडे (२०) रा. कानळदा जळगाव, बलराम जीवनदास सलेचा (५२) रा. सुरत, विवेक राजेश मटानी (१९) रा. सिंधी कॉलनी जळगाव, मोनिका पवन मारोटी (१७) रा. सुरत, अनिलसिंग सदानंद सिंग (५२) रा. अमरोली सुरत, शोभा अनिलसिंग (४८) रा. अमरोली सुरत, श्रेयांश गौतम पोगालीया (१३) रा. सुरत, निलेश शांताराम धनगर (२१) रा. भादली जळगाव, शांताराम किसन धनगर (३८) रा. भादली जळगाव, उषाबाई शांताराम धनगर (३५) रा. भादली जळगाव, नासीर सुभानखान पठाण (३०) रा. सुरत, सैय्यद रियाब (१६) रा. जळगाव, सैय्यद हारुन (३५) रा. जळगाव, सैय्यद आफताब (३५) रा. जळगाव, सैय्यद झोया (१३) रा. जळगाव, जयेश भानुदास वाघरे (२८) रा. जळगाव, भाग्यश्री समाधान पाटील (२) रा. जळगाव, सुफीयाबी अनिफ शहा (३५) रा. सुरत, शेख खलील शेख इसा (५५) रा. सुरत, मोहम्मद मुजाहिद खान मन्सूर खान पठाण रा.सुरत या ३५ जणांचा समावेश आहे.








