रावेर ( प्रतिनिधी ) – सावदा येथे शेळ्या चोरण्याचा अपयशी प्रयत्न करणाऱ्या चोरांपैकी एकाच विसरून राहिलेला मोबाइल पोलिसांच्या हाती लागला होता त्यावरून २ चोरांना शोधून नाशिकहून काल रावेर पोलीस ठाण्यात आणले आहे .
रावेर तालुक्यात सावदा येथील आठवडी बाजाराच्या परिसरात खंडेराव मंदिरासमोरील रस्त्याच्या कडेला बाजाराच्या ओट्यास कार लावून ३ चोरट्यांनी नियोजितपणे शेळ्यांना मका आणि ज्वारी खाऊ घालत वाहनपर्यंत आणून दिवसाढवळ्या ४ शेळ्यां चोरीच्या उद्देशाने थेट कोंबून नेत असताना सै.हसन सै.अलाउददीन उर्फ लाला या तरुणांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव उधळल्याने चोरट्यांची कार व एकाचा मोबाईल फोन पोलिसांच्या हाती लागला होता
या तरुणामुळे शेळ्यासह चोरट्यांनी त्याची कार ( क्र.एम एच ०२ ऐवाय ५१२९ ) घटनास्थळी सोडून पळ काढला होता एका चोराचा मोबाईल कारमध्ये पडून गेल्याने व सावदा पोलिसांच्या हाती लागल्याने चोरट्यांना शोधून काढणे सावदा पोलिसांना सोईचे ठरले होते पोलिसांनी नासिक येथून अशपाक गुलाब खाटीक व तौबीर मो.आमिन या दोन्ही चोरट्यांना जेरबंद करून ३ जानेवरीरोजी सावदा पोलीस स्टेशनमध्ये आणले
शेख अजीज शेख शरीफ ( रा.शेखपुरा सावदा ) यांनी फिर्याद दिल्याने त्यांच्याविरुद्ध गुरनं.१३/२०२२ भांदवी कलम ३७९ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली दोन्ही संशयित आरोपींना आज रावेर न्यायालय येथे हजर करण्यात येणार होते.तपास एपीआय देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत .