चोपड्यात ३० जानेवारीपासून होणार आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) :- चोपडा येथे दि. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या वीर गुर्जर क्रिकेट लीगच्या लोगोचे अनावरण बुधवारी करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, दोडे गुर्जर संस्थानचे सचिव डॉ.राधेश्याम चौधरी, माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, अजय पाटील, नवलसिंग राजे पाटील, गुर्जर कवी प्रफुल्ल पाटील, आयकर विभागाचे अधिकारी हिरालाल पाटील, पोस्ट ऑफीसचे अधिकारी तथा माजी सैनिक गोपाल पाटील, वीर गुर्जर क्रिकेट लीगचे मार्गदर्शक अविनाश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी चोपडा येथे होणाऱ्या वीर गुर्जर क्रिकेट लीगला शुभेच्छा दिल्या.