हा सन्मान सोहळा १ मे २०२५, महाराष्ट्र दिनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान विनोद पाटील यांना सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि विशेष सत्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. विनोद पाटील यांनी सावदा पोलीस ठाण्यासह रावेर पोलीस ठाण्यात सुमारे ७ वर्षे सेवा देताना आपल्या कर्तव्यनिष्ठेने आणि कार्यकुशलतेने सर्वांचे मन जिंकले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सावदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, पीएसआय बशीर तडवी यांच्यासह संपूर्ण पोलीस कर्मचारीवृंदाने अभिनंदन केले आहे. तसेच, रावेर तालुक्यातूनही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.