जळगाव ( प्रतिनिधी ) – पिंप्राळा भागात ३० वर्षीय विवाहितेचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्राळा भागात ३० वर्षीय विवाहिता पतीसह वास्तव्याला आहे. सोमवारी सकाळी विवाहिता पती व मुलासह दुचाकीने दवाखान्यात जात असतांना नुर मोहम्मद लतीफ (वय-४० , रा. जळगाव ) याने दुचाकीचा पाठलाग केला. नंतर त्यांच्या दुचाकीसमोर त्याची दुचाकी लावून त्यांना थांबविले. विवाहितेला माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझे घर किंवा पैसे दे असे म्हणत महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला आणि ठार मारण्याची धमकी दिली. विवाहितेच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात आरोपी नुर मोहम्मत लतीफ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सतिष डोलारे करीत आहेत.