जळगाव ( प्रतिनिधी ) – गच्चीवर झोपलेल्या अल्पवयीन मुलीला मिठी मारुन विनयभंग करणार्या महेश भोसले (वय-१९, रा. पिंप्री गणेशपुर ता. चाळीसगाव) या आरोपीला विशेष पोक्सो न्यायालयाने तीन वर्ष सक्त मजूरीची शिक्षा सुनावली. या खटल्यात सात जणांची साक्ष महत्वाची ठरली आहे.
पिडित अल्पवयीन मुलगी गच्चीवर झोपलेली असतांना महेश भोसले आला, त्याने पिडीतेला मिठी मारुन विनयभंग केल्याची घटना १५ मे २०१६ रोजी घडली होती. पिडीतेने आरडाओरड केल्यानंतर पिडितेच्या आईने मुलीची सुटका करीत आरोपीला पकडले. चाळीसगाव ग्रामीण पोलीसात आरोपी महेश भोसले विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटल्याचे कामकाज विशेष पोक्सो न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयासमोर सुरु होते.
या खटल्यात सात साक्षीदार तपासण्यात आले. पिडीतेसह आईची साक्ष महत्वपुर्ण ठरली. साक्ष व पुराव्याअंती महेश भोसले दोषी ठरला सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी युक्तीवाद करीत पुरावे सादर केले. भोसले याला दोषी ठरवित तीन वर्ष सक्त मजूरीची शिक्षा सुनावली गेली.