विनयभंग करून फरार झालेल्या संशयिताला मुंबईतून अटक
मेहुणबारे पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील एका गावात विनयभंग करून एक संशयित फरार झालेला होता. याबाबत दाखल गुन्ह्यात मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध लावून त्याला मुंबईतून अटक करून आणली आहे.
मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे दि. २५ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील महिलेचा विनयभंग करणारा संशयित आरोपी नामे युवराज नामदेव पवार (रा. शिरसगांव ता. चाळीसगांव) हा गुन्हा केलेपासून ९ वर्षे फरार होता. सदरचा गुन्हा हा महिलांचे बाबतचा गंभीर स्वरुपाचा असल्याने आरोपीस अटक करणे आवश्यक होते. नमुद आरोपीचा शोध घेत असताना सदरचा आरोपी हा मुंबई येथे असलेबाबत गोपनिय माहीती प्राप्त झाली होती.
आरोपीचा शोध घेणेकामी प्रभारी अधिकारी प्रविण दातरे, सहायक पोलीस निरीक्षक यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक नेमले होते. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नमुद आरोपीचा तांत्रिक पध्दतीने तपास करुन त्यास अंधेरी मुंबई येथून शिताफीने ताब्यात घेवून पोलीस स्टेशन येथे घेवून आले. त्यानंतर आरोपीस नमुद गुन्हयामध्ये अटक करुन त्याची न्यायालयीन कस्टडी मध्ये रवानगी करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी प्रविण दातरे, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उप-निरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उप-निरीक्षक विकास शिरोळे, पोहेकों शांताराम पवार, पोकों विनोद बेलदार, पोकों संजय लाटे यांनी केली आहे.









