जळगाव महानगरपालिकेने दिली फिर्याद
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील खेडी शिवारातील मोकळ्या जागी एका नागरिकाने दोन झाडे आणि फांद्या तोडल्याप्रकरणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महानगरपालिकेचे अधिकारी बाळासाहेब बळवंतराव चव्हाण (वय ५५, रा. आदर्शनगर, जळगाव) असे फिर्यादीचे नाव आहे. संशयित आरोपी चंद्रकांत पांडुरंग जोशी (रा. खेडी शिवार) यांनी खेडी शिवार मधील ४८/१ ओपन प्लेस येथे लावलेली कडुनिंबाची दोन झाडे व एका झाडाची फांदी तोडल्या आहेत. त्यांना महानगरपालिकेतर्फे नोटीस देऊन दंडाची रक्कम भरण्यास सांगितली. मात्र संशयित चंद्रकांत जोशी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे महानगरपालिकेतर्फे बाळासाहेब चव्हाण यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. तपास पोलीस नाईक चंद्रकांत बडगुजर करीत आहे.