जळगाव ( प्रतिनिधी ) — एमआयडीसी भागात चहाची विकणाऱ्या ४५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याचे आले . एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी भागात चहाची विक्री करण्याचे काम ४५ वर्षीय महिला करते. चहाच्या टपरीवर रविवारी दुपारी अंकुश साईदास चव्हाण (रा. समतानगर ) याने विनापरवानगी दुकानात घुसून महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून अश्लिल शिवीगाळ केली व तिचा विनयभंग केला. महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी अंकुश चव्हाण यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो . हे . कॉ . जितेंद्र राजपूत करीत आहे.







