धरणगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील बाभूळगाव परिसरात आज सकाळी जोरदार पाऊस झाला यामुळे ‘महावितरण’ची दाणादाण उडाली. वीज वाहक तार तुटल्याने ३ म्हशी जागीच ठार झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
जळगाव जिल्ह्यात 16,17 रोजी हवामान खात्याने पाऊस पडणार असल्याचे संकेत दिले होते रात्रीपासून पावसाने हजेरी लावली होती आज सकाळी दमदार पावसाने ‘महावितरण’ची दाणादाण उडाली..बाभुळगाव परिसरात सकाळी शेतकरी सर्व गुरे घेऊन चरण्यासाठी घेऊन जात असताना अचानक विजेचे तार तुटल्याने बाभुळगाव येथील लक्ष्मण तुकाराम कोळी या शेतकऱ्यांच्या तीन म्हशी जागीच ठार झाल्या आहेत.
या शेतकऱ्याचे 2 लाखांपर्यंत नुकसान झाले आहे. घटनास्थळी तलाठी आरिफ शेख यांनी पचनामा केला . नागरिकांनी पोलीस स्टेशन, महावितरण यांना घटनेची माहिती दिली.