भुसावळ शहरातील रेल्वे नॉर्थ भागातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील रेल्वे नॉर्थ कॉलनी भागातील संघर्ष दुर्गा मंडळाचे कार्यकर्ते आरास करत असतांना २३ वर्षीय युवकाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवार १ रोजी रात्री १० वाजता घडली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोेद केली आहे.
प्रतीक अनिल मिसाळ (२३) असे मयत तरुणाचे नाव आहे. शहरातील द्वारका नगरातील रहिवासी प्रतीक मिसाळ हा युवक रेल्वे नॉर्थ कॉलनीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठी शाळेसमोर असलेल्या संघर्ष दुर्गा मंडळाची आरास मंडळातील कार्यकर्त्यांसह करीत होता. त्यावेळी त्याला विजेचा जोरदार धक्का लागला.
सोबतच्या मित्रांनी प्रतीक याला शहरातील खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. ट्रामा केअर सेंटरला शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी प्रतीकचे मामा रत्नाकर गोंविंद तायडे यांनी दिलेल्या माहितीवरून शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तपास हवालदार विनोद सपकाळे करीत आहे.