चोपडा तालुक्यातील बिडगाव येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शौचास जात असताना रस्त्यात पडलेली विजेची वायर न दिसल्याने त्याला स्पर्श होऊन विजेचा धक्का बसून एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील बिडगाव येथे सकाळी ११ ते १२ वाजेदरम्यान घडली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.
लतीफ इकबाल तडवी (वय ५५, रा. बिडगाव ता. चोपडा) असे मयत प्रौढाचे नाव आहे. ते गावात पत्नी, २ मुले, २ मुली असा परिवार आहे. मोलमजुरी करून लतीफ तडवी हे परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन) सोमवारी दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेनंतर ते शौचास जात असताना रस्त्यात पडलेल्या वायरचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून लतीफ तडवी हे दूर फेकले गेले. यावेळी ग्रामस्थांनी त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केले असता त्याला तपासून मयत घोषित करण्यात आले.
यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. शनिपेठ पोलीस स्टेशन येथे प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहे. दरम्यान, लतीफ तडवी यांच्या मृत्यूमुळे परिवारातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबियांना धक्का बसला असून गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.