जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- तुमचे वीज मीटर नादुरुस्त आहे. तुमच्यावर वीजचोरीचा गुन्हा दाखल करायचा नसेल तर दीड लाख रुपये लाच मागून तडजोडीअंती लाख रुपये लाच मागितल्याप्रकरणी दोघा वायरमनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३० वर्षीय तरुण तक्रारदार दि. २ डिसेंबर रोजी भरारी पथकाने एकूण ५ वीज मीटर काढून तुमचे वीज मीटर नादुरुस्त आहे. तुमच्यावर जर वीज चोरीचा गुन्हा दाखल करायचा नसेल तर दीड लाख रुपयांची लाच द्यावी लागेल अशी मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता वायरमन संशयित धनराज आणि गोटू (पूर्ण नाव गाव माहिती नाही) यांनी प्रत्येकी एका वीज मीटर चे ३० हजार रुपये याप्रमाणे एकूण दीड लाख रुपये मागणी केली. तडजोडी अंति १ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. म्हणून शनिपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नेत्रा जाधव, पीएसआय दिनेशसिंग पाटील, नाईक किशोर महाजन, बाळू मराठे, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी यांनी कारवाई केली आहे.