डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात देशभक्तीपर कार्यक्रम
जळगाव – ७६ व्या प्रजाकसत्ता दिनानिमीत्त गोदावरी संस्थेच्या विविध संस्थामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात विविध देशभक्तीपर कार्यक्रम सादर करण्यात आले.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात सकाळी ७ वा ३० मि. संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी, हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील,वैदयकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत,रजीस्ट्रार प्रमोद भिरूड,डॉ चंद्रया कांते, डॉ. सी.डी सारंग, होमीओपॅथी महाविद्यालयाचे संचालक डॉ. डी.बी पाटील, प्रिन्सीपल डॉ.आर के मिश्रा, फिजिओथेरेपीचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.विशाखा गणविर,हॉर्टीकल्चर संचालक सतिष सावके,आणि सुरेंद्र गावडे यांच्या उपस्थीतीत विविध कार्यक्रमात विदयार्थ्यांचे मनोगत,भक्तीगिते,नृत्य कला सादर करण्यात आल्यात.