मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील निमखेडी खुर्द येथील शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली
अजय रुस्तम घोडकी (वय 38) हे हरताळा शिवारातील स्वतःच्या शेतामध्ये काम करत असताना त्यांच्या अंगावर आज दुपारी २:३० वाजेच्या सुमारास वीज पडल्याने त्यांचा मृत्यु झाला आहे. मुक्ताईनगर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह हलविण्यात आला आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.