यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील डोंगर कठोरा येथील गुरे चारणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास आभाटा शिवारात घडली. घटनेचा पंचनामा करण्यात येत आहे.
ज्ञानेश्वर सुका बाउस्कर (वय-५० , रा. डोंगर कठोरा ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ज्ञानेश्वर बाविस्कर कुटुंबियासह राहतात. गुरे चारून उदरनिर्वाह करतात. आज आभाटा शिवारात दुपारी गुरे चारत असतांना वीजेच्या कडकडटासह पाऊस सुरू झाला. त्यावेळी ज्ञानेश्वर बाऊस्कर हे टेकडीवर उभे होते. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज पडल्याने ते टेकडीवरून खाली कोसळले त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अशी माहिती सोबत असलेल्या नागरीकांनी दिली . पोलीस पाटील राजरत्न आढळे, सरपंच नवाज तडवी, तलाठी वसीम तडवी, दिलीप तायडे आदीनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात आणला . मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरूष गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.