पारोळा तालुक्यातील घटना
पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्यातील मोरफळ येथील १७ वर्षीय मुलीचा विहिरीचा पाण्यात पडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी १६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अश्विनी नाना सोनवणे (वय १७) असे मृत तरुणीचे नाव आहे. बुधवारी ती सकाळी अकराच्या सुमारास घरी होती. नंतर नैसर्गिक विधीसाठी ती घरच्यांना सांगून गेली. ती लवकर न आल्याने ग्रामस्थ व नातेवाइकांच्या सहकार्याने परिसरात तिचा शोध घेण्यात आला. तिची चप्पल गावाच्या शेतात विहिरीजवळ आढळून आल्याने विहिरीत डोकावले असता ती आढळून आली.
ग्रामस्थांच्या मदतीने अश्विनीस पाण्यातून बाहेर काढून पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केले. बाबत पारोळा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक राजू जाधव तपास करीत आहेत.