अमळनेर तालुक्यात पाडसे येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने वृद्ध शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि. ३ रोजी सकाळी १०.३० वाजता उघडकीस आली. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भाईदास उत्तम गव्हाणे (वय ६५, रा. पाडसे ता. अमळनेर) असे मयत वृद्धाचे नाव आहे. तालुक्यातील पाडसे येथील भाईदास हे ३ जून रोजी सकाळी शेतात गेले होते. त्यांचा पुतण्या अरुण गव्हाणे याला १०.३० वाजता ते शेतातील विहिरीजवळ उभे असताना दिसले. मात्र पाच मिनिटांनी ते न दिसल्याने त्यांचा पुतण्याला शंका आली.(केसीएन)त्यामुळे त्याने विहिरीत उडी मारून पाहिले, मात्र पाणी खोल असल्याने भाईदास गव्हाणे हे दिसले नाहीत. त्यानंतर अरुण गव्हाणे याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलवून पाण्याचा पंप सुरु करून पाणी उपसले. त्यावेळी भाईदास गव्हाणे हे दिसले. त्यानंतर त्यांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ शरीफ पठाण हे करीत आहेत.