जळगाव (प्रतिनिधी) – शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी उद्या दि.२३ ते २५ ऑगस्ट, २०२१ या कालावधीत आॕनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहे.

शासनाचे निर्देश व विद्यापीठ अधिकार मंडळाने हा निर्णय घेताला आहे. दि.८ जून २०२१ पासून दि.३१ जुलै, २०२१ पर्यंत झालेल्या (उन्हाळी) परीक्षांचे निकाल जाहिर झाले आहेत.( शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षा वगळता) या परीक्षेमधील बहिस्थ लेखी व बहिस्थ प्रात्यक्षिक परीक्षांना अनुपस्थित किंवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बहिस्थ लेखी परीक्षा दि.२३ ते २५ ऑगस्ट, २०२१ या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ या दरम्यान ऑनलाईन पध्दतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (एमसीक्यु) स्वरुपात स्मार्ट फोन/ लॅपटॉप/डेस्क स्टॉप वेब कॅमेरासह याद्वारे घेण्यात येणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी या कालावधीत विद्यापीठ संकेतस्थळावर देण्यात आलेल्या https://nmu.unionline.in या लिंकवर जाऊन परीक्षा द्यावयाची आहे.वरील परीक्षेत जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते त्यांनी परीक्षेसाठी लाॕगिन करताना पीआरएन क्रमांकाच्या शेवटी आर नमूद करणे आवश्यक राहील. ज्या परीक्षांचे ज्या विद्यार्थ्यांचे निकाल तांत्रिक अडचणीने जाहीर झाले नव्हते त्यांचे निकाल संकेतस्थळावर उपलब्ध असून हा निकाल पाहूनच अनुत्तीर्ण विषयांसाठी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे.वेळापत्रक संकेतस्थळावर देण्यात आले आहे. अशी माहिती परीक्षा व मुल्यांकन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ.किशोर पवार यांनी दिली.







