पुणे ( वृत्तसंस्था ) – पुण्यात एका तरुणाने विवाहित महिला डॉक्टरसोबत विकृत कृत्य केलं गुजरातच्या तरुणाने डॉक्टर महिलेला व्हिडीओ कॉलवर नग्न होण्यास भाग पाडले. त्यानंतर ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले, या तरुणाने ते अश्लील व्हिडीओ महिलेच्या पतीला देखील पाठवले.
याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलिसांत तक्रार दाखल केली पोलिसांनी प्रणव पांचाळ नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.
प्रणव पांचाळ हा गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील अटलादरा येथील रहिवासी आहे. पीडित डॉक्टर महिला विवाहित आहे. काही दिवसांपूरर्वीच तिची प्रणव पांचाळशी ओळख झाली होती. त्यानंतर त्याने महिलेचा विश्वास संपादन केला आणि तो तिच्याशी व्हॉट्सअॅपवरुन व्हिडीओ कॉलवर बोलायचा. त्याने महिलेला व्हिडीओ कॉलवर नग्न होण्यास भाग पाडले आणि त्याने त्याचा व्हिडीओही स्क्रिन रेकॉर्ड केला. महिलेला याबाबत जराही शंका नव्हती. मात्र, प्रणव पांचाळने तो अश्लील व्ंहिडीओ पीडित महिलेच्या ई-मेलवर पाठवून दिला. तो यावरच थांबला नाही तर त्याने हा व्हिडीओ महिलेच्या पतीलाही पाठवला.
त्याने हा व्हिडीओ पीडित महिलेच्या नातेवाईकांना पाठवून तिची बदनामी करण्याची धमकीही दिली. त्यामुळे पीडित महिलेने थेट पोलिसांत धाव घेतली. पीडित महिलेचं सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालं आहे. आता वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.