विधी सेवा प्राधिकरणतर्फे कायदेविषयक मार्गदर्शन
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव, शक्ती फाऊंडेशन आणि अॅड. एस. ए.बाहेती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न झाले.
कायदेविषयक शिबिरामध्ये प्रामुख्याने वाहतूक नियम, अँटी रॅगिंग, घरगुती हिंसाचार व लोक अभिरक्षक कार्यालयाची माहिती देण्यात आली. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अधिकारी भूषण मोरे, ऋषिकेश महाले उपस्थित होते. तसेच लोक अभीरक्षक कार्यालयाचे प्रमुख अॅड.अब्दुल कादिर,सहाय्यक लोक अभीरक्षक अॅड.अभिजीत रंधे व अॅड. शिल्पा रावेरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल लोहार यांनी स्वीकारले.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. नीलिमा ठमके यांनी केली तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. हिवरे यांनी केले. सूत्रसंचालन ही प्रा. खेमराज पाटील यांनी केले.