भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या यादीत भाजपने संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना संधी दिली आहे. संदीप जोशी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बालपणीचे मित्र आणि निष्ठावान सहकारी असल्याचे सांगितले जात आहे.
विधान परिषदेच्या या निवडणूकीसाठी १० मार्च रोजी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्याात आली. यासाठी १७ मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. तर २७ मार्च रोजी यासाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.